By  
on  

बिग बॉस मराठी 3 : टास्कदरम्यान टीमच्या निर्णयामुळे सुरेखा कुडची नाराज

बिग बॉस मराठीच्या घरात टास्कदरम्यान अनेक मतभेद होताना दिसतात. बिग बॉसने एखादा टास्क दिला की टास्क करत असताना स्पर्धकांचे वाद होतना दिसतात. बिग बॉसने या स्पर्धकांना नुकताच एक टास्क दिलाय. या टास्कदरम्यानही दोन गट पाहायला मिळाले.

यावेळी टीममधील चर्चेत सुरेखा ताई थोड्या नाराज असल्याचे दिसून येणार आहे. सुरेखाताईंनी टीमला विचारले, “तुमचं काय ठरतयं मग.  कसं करायचं”.  यावर मीनल म्हणाली, “जेव्हा बजर वाजेल तेव्हा आपण निर्णय घेऊ काय करायचे. आता मी विचारत होते याची काय चर्चा झाली. तेव्हा उत्कर्ष त्याला कुठे ना कुठे कन्वीन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे तू ये तुला सेफ करू. उत्कर्षचं हेचं सुरू आहे तो प्रत्येकाला वेगवेगळी कहाणी सांगतो आहे." 

त्यावर तृप्ती देसाई म्हटल्या की, “पण आता तर ते म्हणाले की त्यांनी विकासला सांगितला सुरेखाताईंना पाठवा”.  त्यावर विकास म्हणाला “दादुस आमचं ठरलेलं आहे”. त्यानंतर प्रत्येकाने त्यांची त्यांची नावं नावं दिली... मीनलने आविष्कारचे नाव घेतले, तृप्ती देसाई यांनी सुरेखाताईंचे नाव घेतलं, विशाल म्हणाला आविष्कार. बहुमताने आविष्कार दारव्हेकरचं नाव पुढे आल्यामुळे सुरेखा ताई म्हणाल्या "मला माहिती होतं हे म्हणूनच....”  

या सगळ्या चर्चेत सुरेखा का नाराज झाल्या हे आजच्या भागात समोर येईलच.


 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive