By  
on  

बिग बॉस मराठी 3 : सुरेखा आणि आदिशमध्ये वाद, आदिश म्हटला “कालपर्यंत गेम खेळायचा नव्हता ना या बाईला

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आदिश वैद्यची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाल्यापासून त्याचे काही सदस्यांशी खटके उडत आहेत. सुरुवातीला जयसोबत त्याचा वाद झाला होता. त्यानंतर गैरसमजामुळे त्याचा स्नेहासोबत वाद झाला. आजच्या भागात आदिश आणि सुरेख कुडची यांचं भांडण होताना दिसेल.

सध्या बिग बॉस मराठीच्या घरात नवा टास्क पाहायला मिळतोय. यात घरात बीबी कॉलेज उभारण्यात आलय. या बीबी कॉलेजमध्ये आता सुरेखा कुडची, मीरा जगन्नाथ, सोनाली पाटील हे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायला घेणार आहेत. बिग बॉसनी  'करूया आता कल्ला' हे साप्ताहिक कार्य स्पर्धकांना दिलय. ज्यात उत्कर्ष, दादूस, आदिश आणि सोनाली यांच्या क्लासनंतर सुरेखा कुडची देखील प्राध्यापक म्हणून क्लास घ्यायला येणार आहेत.

सुरेखा या नृत्य हा विषय शिकवणार आहेत. क्लासमध्ये आल्यानंतर त्यांनी स्नेहा वाघचे कौतुक केले, विशाल निकमशी गंमतीशीर संवाद साधला. मात्र प्राध्यापक बनलेल्या आदिशला त्यांनी टोमणा मारलाय.


 

सुरेखा कुडची यांचा क्लास सुरू असताना आदिश वैद्य त्यांना म्हणाला, “चला चला कार्य सुरू ठेवा”. त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, “प्रोफेसर आदिश वैद्य यांना विनंती मी करते की प्लीझ तोंड बंद ठेवा. कारण तुमची जस्ट एंट्री झाली आहे बीबी मध्ये, आम्ही जुने आहोत”

सुरेखा कुडची यांच्या या प्रतिक्रियेमुळे आदिशला राग अनावर झाला. तो म्हणाला, “कालपर्यंत गेम खेळायचा नव्हता ना या बाईला, स्वत:ला जायचं होतं कालपर्यंत बाहेर." असं आदिश इतर स्पर्धकांना बोलताना दिसेल. तेव्हा हा वाद नेमका कशामुळे झाला. सुरेखा आणि आदिशमध्ये काय संवाद झाला हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive