बिग बॉस मराठीच्या घरात दोन गट पडले असले तरी काही स्पर्धक हे दोन्ही गटांसोबत चांगले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दादूस. कोणताही टास्क दिला गेला की सगळे स्पर्धक दादूस यांना त्यांच्या बाजूने करुन घेण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न नव्या टास्कसाठी केला गेला.
'करुया आता कल्ला' या टास्कमध्ये दादूस यांचं मत मिळवण्यासाठी विशाल आणि तृप्ती देसाई दादूससोबत चर्चा करताना दिसले. घरात उभारलेल्या बीबी कॉलेजीमध्ये प्रत्येक विद्यार्थी सदस्य प्राध्यापक बनलेल्या सदस्यांना त्यांनी स्टार त्या व्यक्तिला वा त्यांच्या गटातील दुसर्या सदस्याला का द्यावे हे पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण यात दिलेला शब्द न पाळल्यामुळे सदस्यांमध्ये नाराजी दिसून आली. संतोष चौधरी उर्फ दादूस यांच्यासोबत याचविषयावर तृप्ती आणि विशाल चर्चा करताना दिसतील. दादूस प्राध्यापक झाले असताना त्यांना स्नेहाला स्टार दिला. त्यामुळे इतर सदस्यांमध्ये नाराजी आहे.
तृप्ती देसाई आणि विशाल दादूसला विचारताना दिसणार आहेत की, “आपलं बोलणं झालं होतं ना तृप्ती ताईंना नाही विशालला स्टार द्यायचा. तुम्ही शब्द देऊ नका मग.” तृप्ती देसाई म्हणाल्या, “तुम्ही असे शब्द दिले ना तर उद्या अवघड होईल तुमचं”. यावर दादूस म्हटले की, “मी माझ्या डोक्याने खेळतो कोणाच्या सांगण्यावरुन खेळत नाही आणि खेळणार पण नाही. आणि मला काही अवघड होणार नाही, मी कोणाला घाबरत नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे”.
तृप्ती देसाई म्हणतात की, “तसं नाही बोलत आहे आम्ही. मी सुध्दा इथे पण नाही, तिथे पण नाही. पण निर्णय घेताना मी ठाम असते की कोणाला मत द्यायचं. अशामुळे तुम्हाला आपलं मानणारी मतं पुढे बदलू शकतील."
नेमकी ही चर्चा कशामुळे सुरु आहे. दादूस यांना या चर्चेत कुणावर राग आला का ? हे आगामी भागात पाहायला मिळेल.