बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागात मीनल आणि आदिशमध्ये जोरदार भांडण होणार आहे. टास्क दरम्यान दोघांमध्ये खटका उडाला आणि त्याचमुळे आदिश मीनलवर नाराज झाला. तर आदिशच्या बोलण्यामुळे मीनल त्याला बजावून सांगणार आहे की, “माझ्याशी नीट बोलायचं”
मीनल आणि आदिशच्या या वादात आता विशालने उडी घेतल्याचं पाहायला मिळेल. विशाल आदिशला सांगणार आहे की मीनलशी बोलून घे. आदिशने त्यावर मीनलशी बोलण्यास नकार दिला. यावर आदिश म्हणतो की “मी सांगितलं ना नाही बोलायच मला आता तुझ्याशी, तर नाही बोलायचे. जेव्हा मी आलो होतो तेव्हा तू मला परत पाठवलस ना”. त्यावर विशालने त्याला सांगितले की "तिने तुला दहा वेळा बोलावलं."
पुढे मीनल म्हणाली की, “ मी तुला म्हणाली, हीच वेळ आहे बोलूया. माझ्याशी असं बोलायचे नाही. मी व्यवस्थित बोलते आहे तुझ्याशी. तू नीट बोल मी पण नीट बोलेन”.
आदिश म्हणाला, आता नाही बोलायचे डोन्ट इन्स्टिगेट. तिला सांग ओरडा ओरड करु नकोस”. या सगळ्यात आदिशला वाटले की विशाल मीनलच्या बाजुने आहे. पण विशाल म्हणतो की, "मी सत्याच्या बाजूने आहे”.
या वादात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.