By  
on  

बिग बॉस मराठी 3 : मीनलने नीथाला केली विकासची चुगली

बिग बॉस मराठीच्या घरात गॉसीप आणि चर्चा या होतच असतात. यात मग काही स्पर्धक एकमेकांची चुगली करतानाही दिसतात. अशीच चुगली मीनल शाहने वाईल्ड कार्ड स्पर्धक निथाजवळ केलीय. 

नुकतीच तृप्ती देसाई यांनी गायत्री आणि मीराला स्नेहाबद्दलची चुगली केली होती. तर स्नेहाने तृप्ती देसाईंबद्दल मीनल, नीथा, सोनालीला चुगली केली होती. तसंच आता मीनल चक्क विकासची चुगली करताना दिसणार आहे.  

नीथा आणि मीनल यांची टास्क विषयी चर्चा रंगलेली दिसणार आहे. नीथा मीनलला सांगते की, "विकास पण इकडचं तिकडे करतो."

यावर नीथा मीनलला म्हणते की, हे माहिती आहे सगळ्यांना म्हणूनच त्यादिवशी नरक आणि स्वर्ग टास्क जेव्हा झाला तेव्हा तो का माझ्यावरती भडकला होता. मी एक वाक्य बोलले होते त्याला आणि तेच त्याला खूप लागलं... की तू स्वत:साठी खेळतोस आणि मी माझ्या टीमसाठी खेळते, आणि हे खरं आहे ते त्यालादेखील माहिती आहे. आम्हांला सगळ्यांना आणि या घराला देखील माहिती आहे."

बॉक्सच्या टास्कदरम्यान मीनलला दुसऱ्या गटात नेमण्यात आलं होतं. तर विरुद्ध गटात विकास, विशाल आणि सोनाली हे तिचं मित्र-मैत्रिण होते. या टास्कदरम्यान मीनलचे तिच्याच मित्रांशी वाद झाले. यात मीनल आणि विकासमध्येही खटके उडाले. आता यानंतरही ग्रुपची बॉंडिंग टिकून राहील का हे पुढील भागात समोर येईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive