बिग बॉस मराठीच्या घरात कधी वाद विवाद हे होत असतातच. कधी मैत्रीतही हे वाद पाहायला मिळतात. असाच वाद झालाय मीनल शाह आणि विशाल निकममध्ये. विकास, विसाल, सोनाली आणि मीनल असा त्यांच्या ग्रुप आहे. या ग्रुपसाठी चौघही टास्कमध्ये जीव ओतून खेळतात. एकमेकांना नॉमिनेशनपासून सुरक्षित करणं असो किंवा कॅप्टन बनवणं यासाठी चौघही एकत्र खेळतात. मात्र कधी कधी त्यांच्यातच खटके उडताना दिसतात.
नुकत्याच झालेल्या एका टास्कवरुन विशाल आणि मीनलमध्ये संवाद झाला. यावेळी दोघांमध्ये खटके उडताना दिसले.
यावेळी विशाल मीनलला म्हटला की "हार पचवायला शिक". यावर मीनलने त्याला उत्तर देत रागात म्हटली की "कानाखाली खेचेन". ज्याचा राग विशाललाही आला आणि तो म्हटला की "तुझ्यात दम आहे तर वाजव." मग मीनल म्हणते की "मला हात नाही खराब करायचे".
पुढे विशाल म्हणतो की "ही कुठली भाषा झाली. आईशप्पथ सांगतो टास्क म्हणून, प्लेयर म्हणून खेळेन बाकी तुझा आणि माझा विषय संपला"
आता या वादानंतर विशाल आणि मीनलमध्ये पुन्हा मैत्री होईल का ? दोघांचं भांडण मिटेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.