बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची होणार आहे. आज घरामध्ये रंगणार आहे “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य ! आणि याच कार्या दरम्यान सोनाली आणि विकासचे भांडण होणार आहे. सोनालीला असं वाटतं आहे विकास तिच्यासाठी खेळला नाही. नक्की काय झालं ? यावर विकास त्याची बाजू मांडताना दिसणार आहे. पण, सोनाली विकासचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये असं दिसून येतं आहे. सोनाली विकासवर आरोप करताना दिसणार आहे. विकासने जी गोष्ट टास्कमध्ये केली नाही वा तो करू शकला नाही त्याचे काही कारण आहे जे तो सोनाली आणि विशाल सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. विकास त्याचा पॉइंट पटवून देऊ शकेल ? कळेलच आजच्या भागामध्ये.
सोनालिचे म्हणणे आहे, ऐक मी तुला सांगते तुझ्या ठिकाणी दूसरा कोणीतरी असता तर तू जे आज केले आहेस ते तू केलं नसंतस ... विकासचं म्हणण आहे, कारण मला इथे मारामारी, पाडापाडी नाही करायची... मी जे पाहिले ना… टेबलवर त्याचं डोकं आपटल असतं... सोनाली म्हणाली, आता त्यांची इच्छा आहे ना तू बसल्यावरती खेळायचं, आता आम्ही तुझ्यासाठी खेळणार. तू माझ्यासाठी नाही खेळलास ना, पण मी तुझ्यासाठी खेळणार. विकासचे म्हणणे आहे, मला emotional blackmail करू नकोस. तुझ्यासाठी डोकी फोडून घ्यायची अशी तुझी इच्छा आहे का ? मारामारी करायची होती का ? काय करायचं होतं ? सोनाली म्हणाली, तुझा गेम माहिती नाही का मला ? विशाल म्हणाला, मारामारी कोणीच नव्हतं करत. विकास म्हणाला, सोनाली मला म्हणते तू काही खेळलास नाही... म्हणजे मी मारामारी केली असती तर खेळलो असं होतं का ? सोनाली म्हणाली, तुला उमेदवारी पाहिजे ना ? मग देऊ तुला उमेदवारी... आणि हा वाद असाच सुरू राहिला... बघूया हा वाद कुठवर गेला ते आजच्या भागामध्ये.
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
By Pradnya Mhatre
on
बिग बॉस मराठी 3 Day 43 :“तू माझ्यासाठी नाही खेळलास. पण........” – सोनाली पाटील
Trending TAGS
- bollywood
- bollywood breaking news
- Bollywood Buzz
- bollywood celebrity gossip
- Bollywood celebrity news
- bollywood entertainment news
- bollywood hot gossips
- bollywood interviews
- bollywood legend
- bollywood lifestyle
- Bollywood News
- bollywood news and gossip
- Marathi Entertainment
- Marathi
- marathi news
- PeepingMoon Marathi
- Marathi PeepingMoon
- marathi website
- Marathi Actress
- Marathi Actors
- marathi actor
- Marathi Stars
- peepingmoon
- marathi entertainment news
- marathi entertainment Marathi play
- Marathi Drama
- Marathi Celebrity
- marathi cinema
Author
Pradnya Mhatre
qwertytrewqwerewq