बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे कॅप्टन्सीची उमेदवारी कोणाला द्यायची. दोन्ही टीममधील प्रत्येक सदस्य एकाच प्रयत्नात आहे की कशी ती उमेदवारी मिळवता येईल. यासाठी विविध वादही होत आहेत. यात उत्कर्ष, मीरा, जय तसेच विशाल आणि जय यांचे भन्नाट प्लॅनिंग बघायला मिळणार आहे.
या कॅप्टन्सीच्या निमित्ताने जय आणि विशाल एकत्र डील करताना दिसणार आहेत. दोघांचा एकत्र संवाद यावेळी पाहायला मिळणार आहे. कॅप्टन्सी कार्यासाठी दोघांची चर्चा झाली असून आगामी भागात ती पाहायला मिळेल.
विशाल जयला म्हणतो की, "मी तुझ्यावेळी नाही हलणार. यावर जय म्हणाला की मला सुद्धा तेच आहे. मी आता तेच सांगितलं. आपण एकमेकांसोबत इतकी डील करु शकतो ना. तो येणार मला माहिती आहे. तो म्हणणार मी नाही बनलो तर... तो उलटा फुटेल मग... मला तू असलास तर चालेल काही प्रॉब्लेम नाही, मी कालसुध्दा सोनालीला बोललो. आम्ही विशाल किंवा स्नेहामध्ये एकाला देऊ पण मग नंतर तो अडवाअडवी करेल तर. भरवसा नाही त्याचा."
जयच्या या म्हणण्यावर विशाल म्हटला की, “त्याचं आणि माझं पण बिनसलं आहे”.
तेव्हा या दोघांच्या डीलनंतर कॅप्टन्सीची उमेदवारी कोणत्या दोन सदस्यांना मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय जय आणि विशाल कुणाविषयी चर्चा करत होते हे देखील समोर येईल.