बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार नवा कॅप्टन्सी टास्क, जय - गायत्रीमध्ये झाला वाद

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात आता रंगणार आहे नवा कॅप्टन्सी टास्क. पुढील आठवड्यात कोण घराचा कॅप्टन बनणार यासाठी नवा टास्क होणार आहे. यासाठी प्रत्येक स्पर्धकाने कंबर कसली आहे. या नव्या कॅप्टन्सी टास्कमध्ये जय - मीरा विरुद्ध गायत्री असं चित्र पाहायला मिळणार आहे. एकीकीडे जयच्या गटात असलेली गायत्री आता त्यांच्या गटापासून दुरावली आहे आणि तिचा कल आता विशाल आणि विकासच्या टीमकडे जाताना दिसत आहे. अशात कॅप्टन्स टास्कमध्ये गायत्रीचे जय आणि मीरासोबत वाद होताना दिसणार आहेत.

टास्कदरम्यान गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण होताना दिसणार आहे. तर जयसोबतही गायत्रीचा वाद होणार आहे. जय गायत्रीला म्हणतो की, "गायत्री दातार तू भेडचाल मध्येच खेळतेस." ज्यावर गायत्री गयला उत्तर देते की, "चोराच्या उलट्या बोंबा."

याशिवाय मीरानेही गायत्रीला खडेबोल सुनावले आहेत. मीरा गायत्रीला म्हणते की, "कोणाच्या मागे तू बुगूबुगू करतेस ना हे कळतं."

यानंतर दोघांनी एकमेकांना टोमणे मारण्यास सुरुवात केली. आता या सगळ्यात कॅप्टन्सी टास्क जिंकून कोण घरचा नवा कॅप्टन बनतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share