बिग बॉस मराठी 3 : गायत्री दुसऱ्या गटात जात असल्याचा जयला संशय

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात आता विशालसोबत त्याच्या गटातील मीनल आणि विकाससोबत सगळं काही ठीक सुरु असून त्यांच्यात पुन्हा आधीसारखी मैत्री पाहायला मिळतेय. याशिवाय गायत्री दातारही त्यांच्या ग्रुपसोबत मिसळलेली दिसतेय. याचाच संशय आता जयला आलाय. गायत्री ही आधी जय, उत्कर्ष आणि मीरा या ग्रुपसोबत होती. मात्र मीरासोबत खटके उडाल्यानंतर गायत्री आता एकटी खेळताना दिसतेय. मात्र तिची टीम बी सोबत चांगली गट्टी झाल्याचं पाहायला मिळतय.  

काही दिवसांपासून गायत्री टीम बी मध्ये जाऊन बसत असल्याने ती भेडचाल खेळत असल्याचं जयला वाटतय. जिथे बहुमत असते तिथेच ती जाते असे अनेक आरोप जय तिच्यावर करताना दिसणार आहे. याचविषयी जय, उत्कर्ष आणि मीरामध्ये चर्चा होताना दिसेल.


 
जय म्हणतो की," गायत्री ही विकासच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेय. ते दोघे हिला कलटी देणार. कुठे तो गेला की तिकडे ती." तर मीरा म्हणाली की, "हेच आधी ती माझ्या मागे मागे करायची." जय पुढे म्हणाला की, "त्यांच्यामध्ये नक्कीच वाद होणार, कारण ती काय करते आहे त्याची पहिली निवड बनण्याचा प्रयत्न करते आहे."

मीरा म्हणाली, "तिथे सगळ्यांमध्ये असुरक्षितता चालू झाली आहे." जयच्या मते या सगळ्यांमध्ये स्मार्ट जर कोणी असेल तर तो विशाल आहे.  

आता या सगळ्या चर्चेनंतर ए टीम गायत्री बाबत कोणता निर्णय घेतील आणि गायत्री टीम बीचा भाग बनेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आगामी कॅप्टन्सी टास्कमध्ये कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय.
 

Recommended

Loading...
Share