बिग बॉस मराठीच्या घरात आता नवे सदस्य दाखल झाले आहेत. तसे ते नवे नाहीत पण पुन्हा एकदा नव्याने दाखल झाले आहेत. याच सिझनमधील तृप्ती देसाई, आदिश वैद्य आणि स्नेहा वाघची बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरात सध्या वेगळं वातावरण पाहायला मिळतय. यातच बिग बॉसने स्पर्धकांना नॉमिनेशन टास्क दिलाय. या टास्कची धुरा या नव्या सदस्यांकडे असणार आहे.
बिग बॉसनी प्रत्येक स्पर्धकाचा फोटो असलेली बाहुली पाढवली आहे. प्रत्येक स्पर्धकाकडे एका दुसऱ्या स्पर्धकाची बाहुली असून आता हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या नॉमिनेशन कार्यामध्ये टॉप 8 सदस्यांना घरात आलेल्या नव्या सदस्यांना हे पटवून द्यायचे आहे की ते घरात रहाण्यास का पात्र आहेत आणि दूसरा सदस्य कसा अपात्र आहे. तर यात गायत्री तिचा मुद्दा तृप्ती देसाई यांना सांगताना दिसणार आहे.
गायत्री म्हणते की, उत्कर्ष हा एक चांगला खेळाडू आहे. फक्त त्यांच्या काहीकाही गोष्टी आहेत ज्या खटकतात. एक म्हणजे चांगले असून तो काही लोकांबरोबर खेळून उगाचंच त्यांच्या मागेमागे जाऊन स्वत:पण नेगेटिव्ह लाईटमध्ये येतो. सरदेखील म्हणाले घरात बुगुबुगू तर उत्कर्षच आहेत. कारण, मीरा बरोबर राहून काय होतं ते मला चांगलंच माहिती आहे, तेच त्याच्याबरोबर आता होतय."
तेव्हा गायत्री उत्कर्षला नॉमिनेट करण्यासाठी तृप्ती यांना प्रोत्साहीत करेल का ? या कार्यात कोणते सदस्य नॉमिनेट होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.