बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात टास्कवरुन स्पर्धकांमध्ये रंगली चर्चा

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरात लवकरच शेवटचे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. याच कार्यावरुन बिग बॉस मराठीच्या घरात सोनाली, उत्कर्ष आण विशाल तर दुसरीकडे आदिश आणि मीनलमध्ये चर्चा रंगली आहे. या नव्या टास्कमध्ये कोण जिंकणार आणि कोणत्या सदस्याला घराचा शेवटचा कॅप्टन बनण्याचा मान मिळणार हे लवकरच पाहायला  मिळणार आहे.

या चर्चांमध्ये सोनाली म्हणतेय की "स्नेहा खूपच अडून राहिलीय." यावर उत्कर्ष म्हणतो की "आता दोन - तीन दिवसांत एलिमिनेशन आहे तेव्हा कोणीना कोणी व्यक्ति निघेल तेव्हा सगळ्यांना खेळण्याची संधी मिळायला हवी."

यावर सोनाली म्हणते की "संचालकाला कळालं पाहिजे की शेवटचं आहे तर सगळ्यांचा खेळ दिसू दे." 

तर दुसरीकडे आदिश आणि मीनलमध्येही चर्चा सुरु आहे. जिथे आदिश म्हणतो की "मी काही मित्र म्हणून संचालन नाही करणार." ज्यावर मीनल म्हणते की "जर तो निर्णय होता तर मी ओको होते. दुसरी संधी द्या. पण मला तुम्ही कॉर्नर नका करु मुद्दाम. सगळे मिळून मुद्दाम करत होते." 

उत्कर्ष विशालला म्हणतो की, "बिग बॉसच्या घरात आपण कितीतरी, प्रत्येक गेममध्ये रूल ब्रेक केले आहेत. विशाल तू मला सांग जेव्हा तू, मी, जय खेळतो किंवा आपण सगळे ताकदवाले एकत्र खेळतो त्यावेळेस बिग बॉस यांनी कधी घराबाहेर काढलं आहे का आपल्याला ? खेळामध्ये तुम्ही खेळा रद्द केला तरी खेळा परत खेळा... खेळू द्या. खेळायलाच नाही मिळालं तर आपण हरतो तिथेच तो गेम."


आता टास्कवरुन या सगळ्या चर्चा सुरु आहेत. मात्र या टास्कमध्ये आता कोण बाजी मारतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


 

Recommended

Loading...
Share