बिग बॉस मराठी 3 हा यंदाचा सिझन फिनालेच्या दिशेने वाटचाल करतोय. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात सात फायनलिस्ट आहेत. नुकतच स्पर्धक गायत्री दातारचं एलिमिनेशन झालय. तर दुसरीकडे वाईल्ड कार्ड सदस्य बनून आलेल्या तृप्ती देसाई, आदिश वैद्य आणि स्नेहा वाघ यांनी बिग बॉसच्या घरात हुकूमशाह बनून धुमाकूळ घातला.
नुकत्याच झालेल्या विकएन्ड चावडीनंतर मात्र तृप्ती देसाईंचा वाढदिवस घरात साजरा करण्यात आलाय. यावेळी तृप्ती देसाईंनी खास कविता सगळ्यांना ऐकवली. "एकटे आलो म्हणून काय झालं सर्वांच होऊन जायचं असतं" अशा या कवितेच्या ओळी होत्या. इतकी समर्पक कविता म्हटल्यावर घरातील सदस्यांना अश्रु अनावर झाले.
सध्या बिग बॉस मराठीच्या घरात वेगळं वातावरण पाहायला मिळतय. एकिकडे फिनाले जवळ येत असताना स्पर्धकांनी आता कंबर कसली आहे. तेव्हा पुढे बिग बॉस मराठीच्या घरात काय होणार, कोणात टास्क या स्पर्धकांना मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.