बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनच्या फिनालेसाठी आता काहीच दिवस वाकी आहेत. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात टॉप सात सदस्य राहिले आहेत. तेव्हा आता स्पर्धकांना अनेक कठिण टास्कचा सामना करावा लागणार आहे. यातच बिग बॉसने स्पर्धकांना तिकीट टू फिनालेची संधी देखील दिलीय.
मात्र नुकत्याच आलेल्या नव्या टास्कमुळे बिग बॉस मराठीच्या घरचं वातावरण बदललय. या टास्कदरम्यान अनेक वाद होताना देखील दिसणार आहे. या वादाचं कारण आहे बिग बॉस मराठी सिझन 3 मधील विजेत्याची धनराशी. यंदा ही धनराशी 25 लाख इतकी आहे. मात्र याच धनराशीचे विभाजन करण्याचा टास्क स्पर्धकांना देण्यात आलाय.
यात प्रत्येक स्पर्धकांमध्ये या धनराशीचे विभाजन स्पर्धकांना करायचे आहेत. यात बिग बॉस यांनी असेही जाहीर केलेय की या टास्कमध्ये दंड स्वरुप यंदाची धनराशी ही शून्य करण्यात येईल.
यात विकासने त्याची धनराशी म्हणून साडे बारा लाख सांगितली आहे. तर मीरा म्हणालीय की तिला ही धनराशी कुणालाच द्यायची नाहीये. आता या टास्कमध्ये या धनराशीचं विभाजन कसं होणार ? बिग बॉस या स्पर्धकांना दंड देऊन धनराशी शून्य करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.