BBM3 Grand finale : उत्कर्ष शिंदे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, टॉप 3 मध्ये आता हे स्पर्धक

By  
on  

बिग बॉस मराठी सिझन 3 ची यंदाची ट्रॉफी कुणाच्या हाती येईल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलय. सध्या बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड फिनाले सोहळा सुरु आहे. मीनल शाहच्या एलिमिनेशन नंतर आता आणखी एका स्पर्धकाचं एलिमिनेशन झालय.

या एलिमिनेशनमध्ये स्पर्धक उत्कर्ष शिंदे एलिमिनेशन झालाय. यंदाच्या सिझनमध्ये उत्कर्षची मास्टरमाईंड अशी ओळख ठरली. तर जयसोबतची त्याची मैत्री ही प्रचंड गाजली.

उत्कर्ष शिंदेच्या एलिमिनेशननंतर आता जय दुधाणे, विशाल निकम आणि विकास पाटील हे स्पर्धक टॉप 3 स्पर्धक ठरलेत. 

तेव्हा जय, विशाल आणि विकासमध्ये बिग बॉस मराठी 3 ची विजेतेपदाची ट्रॉफी कुणाच्या हाती येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share