BBM3 Grand Finale  : विशाल निकम ठरला बिग बॉस मराठी 3 चा विजेता

By  
on  

बिग बॉस मराठीचं यंदाचं सिझन प्रचंड गाजलं. नुकताच सिझन 3चा फिनाले सोहळा पार पडला. यंदाच्या सिझनची ट्रॉफी कुणाच्या हाती येईल याकडे सगळ्यांचच लक्ष होतं. त्यानुसार विशाल निकम हा यंदाच्या सिझनचा विजेता ठरलाय.

 

मात्र जास्तीत जास्त मतांनी विजयी होत विशाल निकमने बिग बॉस मराठी सिझन 3 ची ट्रॉफी पटकावली आहे.विशाल निकम आणि जय दुधाणे हे टॉप 2 फायनलिस्ट होते.


विशालने यंदाच्या सिझनमध्ये अनेक टास्कमध्ये उत्तम कामगिरी केली. सोशल मिडीयावर तर सुरुवातीपासुनच विशालचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. विशालला विजेतेपद मिळाल्यावर त्याच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर आनंद व्यक्त केलाय. 


'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेतून विशालने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या सिझन 3 मध्येही विशालने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

Recommended

Loading...
Share