बिग बॉस मराठीचा नवीन सीझन लवकरच

By  
on  

यंदा बिग बॉस मराठी सीझन 3 प्रचंड गाजला. सर्वच 17 स्पर्धकांनी घरात राडा करत. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. अभिनेता विशसाल निकम हा या 3 -या पर्वाचा विजेता ठरला. त्याचा ट्रॉफी आणि 20 लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला. या तिस-या सीझननंतर प्रेक्षकांना बिग बॉसच्या चौथ्या सीझनचे प्रचंड वेध लागले आहेत. 

तिस-या सीझनला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता लवकरच चौथ्या सीझनच्या तयारीला मेकर्स लागले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीचे चौथे पर्व एप्रिल २०२२ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

चौथ्या पर्वात पुढच्या वर्षी भेटूया असे संकेत शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांना दिलेच होते. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

करोना संकटामुळे बिग बॉस मराठीच्या दोन सीझननंतर तिस-या सीझनसाठी प्रेक्षकांना खुपच वाट पाहावी लागली होती.  

Recommended

Loading...
Share