बिग बॉसने यंदा सामान्य स्पर्धकासाठी एअरटेलच्या माध्याून एक स्पर्धा ठेवली होती. त्यातील विजेत्याला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून झळकण्याची संधी मिळणार आहे. हा भाग्यवान विजेता ठरलाय. नाशिकचा मुलगा त्रिशूल मराठे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.