Big Boss Marathi 4 - बॉयफ्रेंड रोहितकडे साफ दुर्लक्ष करत रुचिरा पडली घराबाहेर

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री रुचिरा जाधवला घराबाहेर पडावं लागलं. स्नेहलता वसईकर, प्रसाद जवादे आणि रुचिरा जाधव हे तिघंही डेंजर झोनमध्ये होते. अखेरच्या क्षणी रुचिरा घराबाहेर पडत असल्याचं जाहीर झालं. बिग बॉस मराठीच्या घरात जाणारं पहिलं कपल अशी रोहत शिंदे आणि रुचिरा जाधवची ओळख होती.  ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून माया म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. 

रुचिरा घराबाहेर पडल्याने तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे भावूक झाला होता.त्याला हा धक्का सहन करता येत नव्हता. त्याने महेश मांजरेकरांना विनंतीदेखील केली होती तिला बाहेर काढू नका, तिच्याऐवजी मी जातो. महेश मांजरेकरांनी त्याला समजावून सांगितले हे कार्यक्रमाच्या नियमांच्या विरोधात असल्याने असे करता येणार नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. शेतकरीच नवरा हवा मालिकेतील कलाकार रुचा गायकवाड, प्रदीप घुले आणि निर्माती श्वेता शिंदे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना भेटले. तर सदस्यांसोबत रंगला एक गेम ज्यात गद्दार कोण ? हे सदस्यांना सांगायचे होते ज्यात रुचिराने अपूर्वाला तर विकासने किरण माने यांना गद्दार ठरवले. यावर किरण माने खूप दुखावले आणि त्याने स्वतःलाच गद्दार म्हणून टॅग दिला. तर यशश्रीने तेजस्विनीला ठरवले गद्दार. समृद्धीने अमृता धोंगडेला तर अक्षयने रोहितला गद्दार ठरवले. प्रसादने किरणला तर अमृता धोंगडेने प्रसादला गद्दार ठरवले. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे यशश्री अपूर्वा, अक्षय आणि अमृता देशमुखवर चांगलीच भडकली. ज्यामध्ये अमृता देशमुखचे म्हणणे होते त्यांनी यशश्रीला खूप आठवडे पोसलंय. यावर यशश्रीने तिचे स्पष्टीकरण त्यांना दिले. 

 

VOOT आरोपी कोण मध्ये प्रसादला आरोपी ठरवले आणि शिक्षा देखील सुनावली. ज्यामध्ये प्रसादने अमृता देशमुखसोबत डान्स करावा असे सांगण्यात आले. आणि मग सगळ्यात कठीण क्षण आला जो कधीच येऊ नये हे घरातील प्रत्येक सदस्याला वाटत असते. प्रसाद आणि रुचिरा डेंजर झोनमध्ये आले. आणि रुचिरा जाधवला घर सोडून जावे लागले.

पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Recommended

Loading...
Share