Big Boss Marathi 4: अक्षय आणि तेजस्विनीमध्ये टास्कदरम्यान खडाजंगी

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या टास्कमध्ये सदस्यांना त्यांच्या मौल्यवान गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. त्यांना त्यांच्या जवळच्या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. आणि याचसाठी काल रोहितने नकार दिला. आज तेजस्विनीचे देखील असेच काहीसे म्हणणे आहे. 

तेजस्विनीने अक्षयला विचारले, तू मेकअपचे काय करायला लावणार आहेस सांग ? अक्षयचे म्हणणे आहे, नष्ट करायचे, दोघांनी नष्ट करायचे. कपडे कि मेकअप ? तेजस्विनी म्हणाली, हे एक्सपेन्सिव्ह आहे... मी नाही करू शकत. अमृता देशमुख म्हणाली, ती म्हणते आहे ती फक्त माझं नाही त्यांचे पण करेल. I AM Ok . तेजस्विनी म्हणाली, जर तू हे नष्ट केलंस ... अमृता देशमुख म्हणाली, I am not in this... मी नाहीये ह्यात कारण त्या पण नाही म्हणतं आहेत.

अक्षयचे म्हणणे आहे, त्यांचा कॉल आहे तो. तेजस्विनीचे म्हणणे आहे, मी हे फोडणार नाहीये हे एवढं एक्सपेन्सिव्ह आहे, कारण मी बघितलं आहे स्नेहलताचं काही फायदा होत नाही त्याचा. आता बघूया तेजस्विनीचा अंतिम निर्णय काय असेल ? 

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Recommended

Loading...
Share