Big Boss Marathi 4 : मागच्यावर्षीचा फायनलिस्ट जय दुधाणेने केली स्पर्धकावर कॉमेंट्, "याने मागचा...."

By  
on  

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरचा कायमच चर्चेत राहणारा जितका लोकप्रिय तितकाच वादग्रस्त कार्यक्रम. हिंदीप्रमाणे मराठीतही तो तितकाच प्रसिध्द आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अभिनेत्री रुचिरा जाधव घराबाहेर पडली. या कार्यक्रमावर सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीसुध्दा आपलं मत व्यक्त करताना पाहायला मिळतात. 

मागच्यावर्षी बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वात सहभागी झालेला मॉडेल आणि स्प्लिट्सव्हिलाचा या एमटीव्हीच्या कार्यक्रमातून तरुणींची मनं जिंकणारा जय दुधाणे आता संपूर्ण महाराष्ट्रभर तितकाच लोकप्रिय आहे. जय त्याच्या परफॉर्मन्समुळे नेहमीच चर्चेचा विषय असायचा. पण आता या पर्वाबाबत त्याने केलेल्या एका कॉमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे. 

जयने नुकताच या पर्वाचा एका भाग बघितला त्यावरून त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहले, आज बिग बॉस मराठी ४ चा भाग बघितला. ‘अक्षय केळकरने मागचा सीजन अगदी पाठ करून आला आहे असं वाटतंय,’ अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जयच्या ह्या स्टोरीवर अनेकजणं आपलं मत मांडताना दिसत आहेत. 

Recommended

Loading...
Share