Big Boss Marathi 4 - बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर रुचिरा जाधव गेली डेटवर

By  
on  

बिग बॉस मराठीचा हा ४ था् सीझन बराच गाजतोय. या बिग बॉसच्या घरात प्रथमच आधीपासून असलेलं एक सेलिब्रिटी कपलने गृहप्रवेश केला. ते म्हणजे रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे. दोघांची लव्हस्टोरी व छान बॉंडिंग पाहायला मिळेल असं वाटलं होतं. पण त्यांच्यातले मतभेदच प्रेक्षकांसमोर आले. दोन आठवड्यांपूर्वी रुचिरा घराबाहेर पडली तेव्हा तिने रोहितचा नीट निरोपही घेतला नाही उलट त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. यानंतर तिने त्याला अनफॉलो केले होते. त्यानंतर आता ती एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

रुचिरा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सक्रीय असतेच. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवर कॅप्शन दिला आहे , “५० दिवसांच्या गॅप नंतर जाऊन भेटलेच त्याला नमो सूर्यायपहिल्यांदाच आमच्या भेटीत इतक्या दिवसांचं अंतर आहे. ४२ दिवस त्याने वाट बघायला लावली. मग मी म्हंटल त्याला थोडी वाट बघू देत. माय सेकण्ड डेट ( ज्याला भेटण्यासाठी मी तयार झाले होते)” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

रोहित बिग बॉसच्या घरात असताना रुचिरा कोणासोबत डेटवर गेली हे जाणून घ्यायला सारेच उत्सुक आहेत. 

Recommended

Loading...
Share