Bigg Boss Marathi 4 : बॉलिवूडच्या एनर्जी मॅनचा तेजूला फुल्ल सपोर्ट, म्हणतो 'जिंकूनच ये'

By  
on  

 कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथा सध्या खूप चर्चेत आहे. मग ते टास्क असो त्यातील सदस्यांचे नाते असो किंवा मग सदस्यांमध्ये असलेले वाद विवाद असो... स्वत: ला सिध्द करण्याच्या प्रयत्नात घरातला प्रत्येक सदस्य आहे. सदस्यांना टास्क पेक्षा देखील कशाची भीती वाटतं असेल तर ती नॉमिनेशन मध्ये येण्याची... नॉमिनेशन पासून कसे दूर रहाता येईल याच्या प्रयत्नात सदस्य असतात.

महाराष्ट्रातील आपले तमाम प्रेक्षक आपल्या लाडक्या सदस्याला वोट करून सेफ करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळे असताना सगळ्या अडचणींवर मात करत घरातील सदस्यांनी आता तब्बल ५० दिवस पूर्ण केले असून त्यांनी खूप महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांचा लाडका रणवीर सिंग याने  तेजस्विनी लोणारी साठी खास शुभेच्छा देणारा व्हिडिओ तयार केला.  सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर viral होत असल्याचे दिसतं आहे. तो म्हणाला, "तेजू शुभेच्छा तू ५० दिवस पूर्ण केले आहेत... my salam to Mahesh Sir... We miss you ... जीत के आओ हम सब सेलिब्रेट करेंगे"! 

 

बघत राहा बिग बॉस मराठी सिझन चौथा आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर सोम ते शुक्र रात्री १० वाजता आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता.

Recommended

Loading...
Share