By  
on  

Big Boss Marathi 4 - धुरळा-राडा, घरात पहिल्यांदाच होणार चार वाईल्ड कार्ड एंट्री !

बिग बॉसच्या घरात इतिहासात पहिल्यांदाच होणार आहेत चार वाईल्ड एंट्री. आता हे चार सदस्य कोण असतील ? ते घरात कधी एंट्री घेतील ? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. लवकरच कळेल कोण असतील हे  सदस्य. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे "युद्ध कॅप्टन्सीचे" हा कॅप्टन्सी टास्क. आणि त्यासाठीच सदस्य आखात आहेत स्ट्रॅटेजि... टास्क मध्ये कसे समोरच्या टीमला हरवता येईल ? प्रसाद, तेजस्विनी आणि अमृता देशमुख तर दुसरीकडे समृद्धी, अक्षय  आणि रोहित. ज्यामध्ये अक्षयचे म्हणणे आहे ते अटॅक नाहीच करणार कारण त्यांच्याकडे शून्य आहे... आता कोण जिंकणार कॅप्टन्सी टास्क ? कोण बनणार कॅप्टन हे आज कळेलच.

काल अपूर्वा कॅप्टन्सी कार्यातून बाद झाली. रोहित आणि तेजस्विनी या आठवड्यातील कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले. तर, बिग बॉस यांनी वारंवार ताकीद देऊन देखील सदस्य उत्साहाच्या भरात आक्रमक होत आहेत. आक्रमकतेवर नियंत्रण न ठेवल्यामुळे विकास आणि रोहित बिग बॉसच्या दंडास पात्र ठरले. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत जेल मध्ये राहण्यास सांगितले. 

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive