Big Boss Marathi 4 : समृद्धी जाधव घराबाहेर; ठरली होती पहिली कॅप्टन

By  
on  

छोट्या पडद्यावरचा बिग बॉस मराठी सीझन ४ हा दिवसेंदिवस रंजक होत आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स या शोमध्ये पाहायला मिळतायत. ‘बिग बॉस’च्या घरातून या आठवड्यात समृद्धी जाधव बाहेर पडली आहे. समृद्धीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास या आठवड्यात संपला. यंदाच्या पर्वातील बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन समृद्धी बनली होती. परंतु, आता खेळातून ती बाहेर पडली आहे.

स्प्लिट्सव्हिला या हिंदी रिएलिटी शोमधून आलेली समृध्दी बिग बॉस मराठीच्या घरात चांगलीच रुळली होती. टास्क खेळण्यात समृध्दीचा वरचा नंबर असायचा. तिला दोनवेळा घराची कॅप्टन्सी मिळाली होती. 

 

बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सदस्यांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली. अमृता धोंगडे, अक्षय केळकरची कानउघडणी केली. तर अपुर्वा नेमळेकर, अमृता देशमुख व तेजस्विनी लोणारीच्या खेळाचं कौतुक केलं.
 

‘बिग बॉस’च्या घरात येणाऱ्या आठवड्यात आणखी चार नवीन सदस्यांची एन्ट्री होणार आहे. याआधी स्नेहलता वसईकरने वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. आता चार सदस्यांनी एन्ट्री केल्यानंतर घरातील समीकरणं कशी  बदलणार हे पाहणं धमाकेदार ठरणार आहे.

 

Recommended

Loading...
Share