Big Boss Marathi 4 : “अंड्याची भुर्जी अन्…”राखी सांवत सोबत तीन सदस्यांची घरात धमाकेदार एन्ट्री!

By  
on  

छोट्या पडद्यावरचा बिग बॉस मराठी सीझन ४ हा दिवसेंदिवस रंजक होत आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स या शोमध्ये पाहायला मिळतायत. बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सदस्यांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली. अमृता धोंगडे, अक्षय केळकरची कानउघडणी केली. तर अपुर्वा नेमळेकर, अमृता देशमुख व तेजस्विनी लोणारीच्या खेळाचं कौतुक केलं.
 

‘बिग बॉस’च्या घरात येणाऱ्या आठवड्यात आणखी चार नवीन सदस्यांची एन्ट्री होणार आहे. याआधी स्नेहलता वसईकरने वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. आता चार सदस्यांनी एन्ट्री केल्यानंतर घरातील समीकरणं कशी  बदलणार हे पाहणं धमाकेदार ठरणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आज बिग बॉस यांनी दिले एक मोठे सरप्राईझ. बिग बॉस मराठी सिझन पहिला यांची चाहूल लागताच एका नावाची आणि एका व्यक्तीची चर्चा खूप होती आणि ती म्हणजे ENTERTAINMENT QUEEN राखी सावंत बिग बॉस मराठी च्या घरात कधी जाणार ? नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनंतर घरातील सदस्यांना तसेच प्रेक्षकांना मोठं सरप्राईझ मिळाले. घरात एक नाही दोन नाही तर चार वाइल्ड कार्ड एंट्री होताना दिसले... आणि यात विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत यांची बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री झाली. आता राखी सोबतच विशाल, मीरा आणि आरोह घरात आल्यानंतर खेळ कसा बदलणार ? त्यांना काय स्पेशल पॉवर मिळणार ? घरातील नाती किती बदलणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. राखी सावंतने या आधी हिंदी बिग बॉसचे सिझन गाजवले आहेत... आता तिच्या येण्याने खेळाला तडका लागणार हे नक्की. घरात आलेले हे चैलेंजर्स घरातील सदस्यांच्या गेमला उलटवून लावणार ? घरात नवे ग्रुप तयार होणार ?  हे सगळं हळूहळू कळेलच. 

 

 

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये चारही चैलेंजर्सची एंट्री झाली. "बिग बॉस मराठीच्या इतिहासात प्रथमच येत आहेत ४ चैलेंजर्स. राखीची एन्ट्री होताच ती म्हणाली, शेवंते... आणि अपूर्वाला हसू फुटले. पुढे ती म्हणाली, या सर्वांची आई आहे मी बिग बॉसची   पहिली बायको... अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार..." बघूया अजून किती सरप्राईझ राखून ठेवले आहेत.

 

बिग बॉस मराठीच्या घरातून समृद्धी जाधवला बाहेर पडावे लागले. पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Recommended

Loading...
Share