Big Boss Marathi 4 - बिग बॉसच्या घरात राखी सावंतचा ड्रामा, पाहा Video

By  
on  

 आज घरात राखी VS विशाल बघायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली. अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, तुला झोपायचं नाहीये का ? तुला नृत्य करायचे आहे ? लाईट बंद झाले ना ? अमृता म्हणाली, झोपते आहे कि त्यावर राखी म्हणाली, मग झोप ... आणि इथून वाद सुरु झाला. अमृता म्हणाली, मला नाही झोपायचं इतक्यात. त्यावर राखी तिला म्हणाली, माझ्या डोक्यावर का नाचतेस ? अमृता म्हणाली, मी इथे बसून नाचते आहे. राखी म्हणाली, मी रात्री बसते तुझ्या डोक्यावर थांब... इडियट...माझी झोपच गेली. आता सगळे झोपल्यानंतर मी बोलणार... उगीच भांडणं ना? विशाल त्यावर म्हणाला, आता झोपा ना तुम्ही. राखी त्यावर म्हणाली, आता नाही झोपणार माझी झोप गेली...बोलणार मी आता, माझी मर्जी. विशाल म्हणाला, तिला शिकवता आणि तुम्ही काय करताय ? तिला का बोलताय एवढं तोंड वर करून. राखी म्हणाली, मी तेच करते आहे जे ती करत होती. विशाल म्हणाला, गप बसायचं. राखी म्हणाली, तू गप बस... 

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Recommended

Loading...
Share