Big Boss Marathi 4 - तेजस्विनीला अश्रू अनावर..घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट

By  
on  

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व बरंच चर्चेत आहे  आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. गेल्या आठवड्यात समृद्धी जाधव घराबाहेर पडली होती. आता तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे.

तेजस्विनीला टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं.

आता वैद्यकीय सल्ल्यानुसार तेजस्विनीला पुढील गेम खेळता येणार नसल्याने तिला घरातून एक्झिट घ्यावी लागली. 

बिग बॉस मराठीच्या घरात आज असे घडले ज्यामुळे सगळ्या सदस्यांच्या अश्रूचा बांध फुटला. तेजस्विनीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला घर सोडून जाणे अपिरहार्य आहे असे आढळून आले. बिग बॉस यांनी तेजस्विनीला confession रूममध्ये बोलावले... तेजस्विनीला सांगण्यात आले, "तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता, या क्षणी सोडावे लागेल... हे ऐकताच घरात शांतता पसरली... किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे यांना अश्रू अनावर झाले. कोणाचाच विश्वास यावर बसत नव्हता. रहिवासी संघावर नेम प्लेट लावण्यावरून जे तेजस्विनी आणि राखी मध्ये वाद झाले होते ते आपल्या सगळ्यांनाच आठवत आहेत... तेजस्विनीने जेव्हा तिच्या नावाची पाटी काढली तेव्हा राखी म्हणाली "हि जागा तुझी आहे"...  बघूया आता पुढे काय घडणार...

 

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Recommended

Loading...
Share