बिग बॉस मराठी 4 अनेक कारणांनी सध्या चर्चेत आहे. राखी सावंतची ह्या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून या कार्यक्रमाला एक तडका लागलाय. शुक्रवारच्या भागात घरातल्या सदस्यांचा विरोध पत्करुन आणि विजेत्याच्या बक्षिसाची रक्कम कमी करुन अखेर आरोह वेलणकर कॅप्टनपदी विराजमान झाला. तो या सीझनचा अखेरचा कॅप्टन ठरला. पण त्याच्यावर चिडलेले इतर सदस्य सुरुवातीला त्याची कॅप्टन्सी मानायलाच तयार नव्हते. तरीही अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे यांनी आपापल्या ड्यूटीस आरोहला सांगून वाटून घेतल्या.
डायनिंग टेबलवर आरोह आणि किरण माने भाजी निवडत होते. तेव्हा राखी तिथे आली, तिने आरोहला निक्षून सांगितलं की, मी कुठलंच काम करणार नाही. कारण मागचे काही दिवस टास्कमध्ये हरल्याने मी भरपूर काम केलं आहे, तेव्हा आरोह व राखीमध्ये थोडा वाद झाला. आरोहने राखीचा उल्लेख फालतू बाई असा केला...त्यानंतर राखी उठून किचनमध्ये गेली आणि पाण्याने भरलेला ग्लास घेऊन आली व तो तिने आरोहच्या तोंडावर फेकला. आरोहचा प्रचंड संताप झाला.
ते पाहून प्रसाद अपूर्वाला राखीला थांबवण्याचा इशारा करु लागला. तेव्हा अपूर्वा म्हणाली, बरोबर करतेय ती ..तेच केलं पाहिजे.
या व्हिडीओमध्ये आरोह वेलणकर, “स्वतःला कोण समजतेस तू नेमळेकर?” असं ओरडून बोलताना दिसते. त्यावर अपूर्वा त्याला, “तू कोण आहेस ना ते पाहा आधी तू मला काय सांगतोस.” असं म्हणते. अपूर्वाचं बोलणं ऐकून चिडलेला आरोह, “चल चल निघ.” असं म्हणतो. नंतर अपूर्वाही त्याला, “स्वतः काय बोलतो, हड-तूडची भाषा करतो.” असंही म्हणते. तिच्या बोलण्यावर आरोह तिला, “फालतू बाई आहेस तू, मूर्ख बाई आहेस एक नंबरची.” असं म्हणतो.