Big Boss Marathi 4 - बिग बॉसच्या घरातून शेवटचं एलिमिनेशन, प्रसाद जवादे घराबाहेर

By  
on  

अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन ४ या शोची ही शेवटी चावडी होती. या शेवटच्या चावडीवर शेवटचं एलिमिनेशन झालं आणि अभिनेता प्रसाद जवादे घराबाहेर पडला. 

सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले आहेत. नुकतंच त्या सदस्यांमध्ये एलिमेनेशन कार्य पार पडले. यात बॉटम ३ मध्ये राखी, अमृता आणि प्रसाद हे स्पर्धक होते. त्यातून काल प्रसाद जवादेची बिग बॉसमधून एग्झिट झाली. ट्रॉफी मिळवण्याचं त्याचं स्वप्न भंगलं. महेश मांजरेकरांशी आपल्या एक्झिटवर बोलताना प्रसाद खुपच भावूक झालेला पाहायला मिळाला.  

Recommended

Loading...
Share