By  
on  

Big Boss Marathi 4 - घराबाहेर पडलेला प्रसाद जवादे म्हणतो, ''मी घरात एकटा...''

अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन ४ या शोची ही शेवटी चावडी होती. या शेवटच्या चावडीवर शेवटचं एलिमिनेशन झालं आणि अभिनेता प्रसाद जवादे घराबाहेर पडला. 

सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले आहेत. नुकतंच त्या सदस्यांमध्ये एलिमेनेशन कार्य पार पडले. यात बॉटम ३ मध्ये राखी, अमृता आणि प्रसाद हे स्पर्धक होते. त्यातून काल प्रसाद जवादेची बिग बॉसमधून एग्झिट झाली. ट्रॉफी मिळवण्याचं त्याचं स्वप्न भंगलं. महेश मांजरेकरांशी आपल्या एक्झिटवर बोलताना प्रसाद खुपच भावूक झालेला पाहायला मिळाला.  आता सोशल मिडीयावर प्रसादने एक व्हिडीओ शेयर केला आहे. 

प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस’च्या घरातील त्याच्या प्रवासाचा उलगडा केला आहे. “माझ्यासाठी हा प्रवास खूप छान होता. सुरुवातीच्या भांडणापासून ते घरात झालेल्या राड्यापर्यंत. काही लोकांबरोबर चांगलं कनेक्शन जुळलं. पण मध्यंतरी मी घरात एकटा पडलो होतो. प्रत्येक नॉमिनेशन प्रकियेत मला नॉमिनेट केलं गेलं. मला वाटतं स्ट्रॉंग स्पर्धकालाच नॉमिनेट केलं जातं. सगळ्या नॉमिनेशन प्रक्रियेतून वाचलो. पण शेवटचं नॉमिनेशन हुकलं. या सगळ्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील”, असं प्रसाद म्हणाला.

 

प्रसादने या व्हिडीओमध्ये अमृता देशमुखबरोबरच्या नात्याबाबतही खुलासा केला आहे. “अमृता एक जवळची व्यक्ती झाली आहे. आम्हाला न बोलता बऱ्याचशा गोष्टी कळायच्या. आतापर्यंत मला भेटलेल्या व्यक्तींपैकी ती एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. आमचं नातं हे निश्चितच मैत्रीच्या पलीकडे आहे”, असंही प्रसाद म्हणाला.

येत्या ८ जानेवारीला या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive