Big Boss Marathi 4 Finale Live Update - 100 दिवसांचा खेळ संपणार, अवघ्या काही तासातच होणार विजेत्याची घोषणा

By  
on  

Live Update :

 

  1. अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर टॉप २ 
  2. किरण माने घराबाहेर  
  3. अमृता धोंगडे घराबाहेर 
  4. किरण माने सेफ झोनमध्ये
  5. अक्षय केळकर सेफ झोनमध्ये
  6. अमृता धोंगडे आणि अपूर्वा नेमळेकर डेंजर झोनमध्ये
  7. राखीने स्विकारली ९ लाखांची ऑफर 
  8. राखीचा गेम झाला ओवर, टॉप ५ मधून राखी सावंत बाहेर
  9. घराला मिळाले टॉप ४ स्पर्धक 
  10. आता अक्षय केळकर, किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अमृता धोंगडे घरात            

 

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा सुरु झाला आहे. घराबाहेर पडलेल्या स्पर्धकांचे रंगतदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतायत.आता थोड्याच वेळात घरात टॉप ३ आणि मग टॉप २ आणि त्यानंतर विजेता जाहीर होईल. अवघ्या महाराष्ट्राचे डोळे या बहुचर्चित रिएलिटी शोकडे लागले आहेत.  बिग बॉसच्या घराला मिळाले टॉप ५ सदस्य. आता घरात अपूर्वा नेमळेकर, किरण माने , अमृता धोंगडे , अक्षय केळकर आणि राखी सावंत हे स्पर्धक उरले असून ते टॉप ५ स्पर्धक आहेत.  

यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा होण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ८ जानेवारी रोजी हा महाअंतिम सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर अनुभवता येणार आहे. 

 

 

 दरम्यान यंदा बिग बॉस मराठीच्या घरात अनेक नवे ट्वीस्ट पाहायला मिळाले. तसेच बिग बॉसच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दुहेरी एलिमिनेशन पाहायला मिळालं. या सीझनमध्ये अनेक गोष्टी स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी नव्या होत्या. अगदी घराच्या सजावटीपासून ते राखी सावंतच्या एन्ट्रीपर्यंत सगळ्याच गोष्टींमुळे प्रेक्षकांना धक्के मिळाले.

बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा आज (८ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजता रंगणार आहे. 

Recommended

Loading...
Share