By  
on  

बिग बॉस मराठी 2: हाय व्होल्टेज ड्रामा करणा-या शिवानी सुर्वेला अजिंक्यचा ‘लव्हडोस’ लागू पडेल का?

सध्या बिग बॉसच्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. या सगळ्याची सुत्रधार आहे ड्रामा क्वीन शिवानी सुर्वे. शिवानीने बिग बॉसच्या घरात असहकार आंदोलन सुरु केल्याचं रसिकांना माहित आहेच. तिने थेट बिग बॉसवरच कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. पण एका मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे तिने लगेच माघारही घेतली. हॉस्पिटलमध्ये बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेशी बोलल्यानंतर मात्र शिवानी शोमध्ये कमबॅक करताना दिसत आहे. एरवी टास्कवेळी आजारी असल्याचं नाटक करणारी शिवानी सदस्यांशी भांडताना किंवा बोलताना फुल फॉर्ममध्ये असते. त्यामुळे शिवानी ड्रामा करते आहे का अशी वाटण्यास जागा आहे.

 

 

शिवानीने बॉयफ्रेंडशी बोलल्यानंतर अजिंक्य ननावरे हे नाव एकदम प्रकाशझोतात आलं आहे. अजिंक्य हा देखील अभिनेता आहे. अजिंक्य शिवानी  ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र झळकले होते. तसेच स्वप्नांच्या पलीकडले, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, गर्ल्स हॉस्टेल, सख्या रे यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

शिवानीबद्दल असलेल्या प्रेमप्रकरणाबद्दल अजिंक्यने आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला,''तू जीवाला गुंतवावे या मालिकेपासून आमच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. २०१५ मध्ये आम्ही या मालिकेच्या शूटिंगनिमित्त एकत्र आलो होतो. सुरुवातीला आम्ही खूप चांगले मित्र होतो. नंतर आम्हाला एकमेकांबद्दल मैत्रीपलीकडे काहीतरी अव्यक्त असं वाटू लागलं. आणि काही काळानंतर मी शिवानीला प्रपोज केलं आणि तिने माझ्या प्रेमभावनेचा स्वीकार केला.''

अजिंक्यने शिवानीला बिग बॉसमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.हे दोघं 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात. आता शिवानीला अजिंक्यकडून मिळालेल्या ‘लव्हडोस’ने शिवानीचा ड्रामा बहरतो की कमी होतो हे लवकरच कळेल.

 

Recommended

PeepingMoon Exclusive