By  
on  

बिग बॉस मराठी 2: रुपालीला यासाठी येतीये आईची आठवण

असे म्‍हणतात की, आपल्‍या रक्‍त्‍याच्‍या नात्‍यांना कधीच विसरू नये. साध्‍या घराण्‍यातून आलेली रूपाली भोसले निश्चितच 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये आपल्‍याला काही प्रेरणा देत आहे. अभिनेत्री अभिजीत केळकर व सुरेखा पुणेकर यांच्‍यासोबत गप्‍पा करताना तिच्‍या कुटुंबाबाबत भावूक होताना दिसत आहे.

रूपाली गार्डनमध्‍ये फेरफटका मारत आहे. ती सांगते की, तिची आई स्‍वावलंबी असून आजही या वयात शिलाई मशिनवर काम करते. रूपाली सांगते की, ती तिच्‍या आईला प्रेरित करण्‍याबाबत म्‍हणते, ''जे तुला आवडतं ते कर.'' ती पुढे म्‍हणते की, रूपालीच्‍या आईने १० वर्षाची असताना तिच्‍या वडिलांना गमावले आणि तेव्‍हापासून तिने कपडे शिवण्‍याचे काम हाती घेतले.

३५ वर्षीय अभिनेत्री तिचा भाऊ संकेतच्‍या रॉड बसवलेल्‍या पायाबाबत सविस्‍तर सांगत म्‍हणते, ''मी म्‍हणते लाजू नको, कर! तिला असं वाटतं की मी वेगळ्या फिल्‍डमध्‍ये आहे तर लोक म्‍हणतील की रूपालीची आई असं करते. तर मी तिला म्‍हणाले की 'काही गरज नाही, मी म्‍हणतेय ना, तर कर!''

रूपाली बिग बॉस घरामध्‍ये येण्‍यापूर्वी संकेतला दिलेल्‍या सल्‍ल्‍याबात सांगते, ''खूप पाऊस असेल, बंद असेल बस तर प्‍लीज थांबा घरी, दगदग नका करू कारण पाय इतका स्‍ट्रॉंग नाही आहे त्‍याचा की प्रवास करू शकेल खूप वेळ.'' अभिजीत या गोष्‍टीबाबत भावूक होऊन संकेतच्‍या स्थितीबाबत विचारतो. रूपाली त्‍याला त्‍याच्‍या पायामध्‍ये रॉड बसवण्‍यात आला आहे आणि २ वर्षांमध्‍ये स्थिती कशी होती याबाबत सांगते. ती तिच्‍या भावाच्‍या निश्‍चयाची प्रशंसा करत म्‍हणते, ''काहीही एक्‍स्‍पेरिअन्‍स नाही ऑटोमोबाइलचा, तरी मल्‍टीनॅशनल कंपनीमध्‍ये तो कामाला लागला.''

रूपालीच्‍या दोघांसोबतच्‍या भावूक गप्‍पा जाणून घेण्‍यासाठी पाहा संपूर्ण क्लिप फक्‍त वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'मध्‍ये.

Recommended

PeepingMoon Exclusive