बिग बॉस मराठी2: घरातील हे लव्हबर्डस आहेत का एकमेकांचे वीकपॉईंट्स?

By  
on  

गेल्‍या 'वीकेण्‍डचा डाव' एपिसोडमध्‍ये महेश मांजरेकर यांनी आणखी एक बॅशिंग सत्र घेतल्‍यानंतर बिग बॉस घरातील स्‍पर्धक त्‍यांच्‍यामधील कमकुवत बाजूंचे आत्‍मनिरीक्षण करू लागले आहेत. पण उत्‍साही व प्रेमप्रकरणात अडकलेली जोडी वीणा व शिव त्‍यांच्‍या कमकुवत बाजूंबाबत आणखी एक गोड संवाद साधताना दिसत आहेत. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये वीणा शिवला 'तेल मालिश' करताना दिसत आहे आणि तेव्‍हाच अभिजीत त्‍यांच्‍याबाबत बोलायला सुरूवात करताना दिसत आहे.

 

शिवच्‍या डोक्‍याची मालिश करणारी वीणा म्‍हणते, ''सर त्‍या दिवशी बोललेच ना की प्रत्‍येकात वीक पॉइण्‍ट आहे, पण तुमच्‍यापैकी कोणी वीक आहे असं नाहीये.'' ती अभिजीत lकेळकरकडे जाते आणि म्‍हणते, ''तुला माहित आहे का रे, माझा वीक पॉइण्‍ट?'' याबाबत तो प्रतित्‍युत्‍तर देतो, ''हो मला माहित आहे. ते उत्‍तर ना 'एस'वरनं आहे!'' याबाबत वीणा मान्‍य करते आणि म्‍हणते, ''ए मला पण वाटलंच आणि दुसरं 'टी'वरून, म्‍हणजे अक्‍खा टी!'' ती अ‍गदी गोंडसपणे शिवचे गाल ओढते.


 

त्‍यानंतर अभिजीत तोच प्रश्‍न विचारायला शिवकडे जातो, तो म्‍हणतो की व्‍यक्‍तीचे नाव 'आर'वरून सुरू होते. वीणा आणि अभिजीत हे ऐकल्‍यानंतर अचंबित होतात आणि 'आर'बाबत विचार करू लागतात. त्‍याचा अर्थ म्‍हणजे रूपाली. पण शिव नंतर गोंधळाची स्थिती सांभाळून घेतो आणि म्‍हणतो ''राणी!'', जे वीणाचे टोपण नाव असते. शिव पुढे म्‍हणतो, ''एच वरून म्‍हटलं असतं तर जीवच गेला असता माझा. माझी एवढी हिम्‍मत नाही. टकलंच करणार तू मला! जोपर्यंत मी म्‍हणेल की गम्‍मत होती तोपर्यंत तू म्‍हणशील आता निघाले केसं.'' हिनाकडे बोट दाखवत बोलतो. खरंच ही परिपूर्ण जोडी आहे, जी आपल्‍याला जोडीदाराबाबतच्‍या ध्‍येयांबाबत सांगत आहे, हो ना? पाहा घरातील न पाहिलेली दृश्‍ये फक्‍त वूटवरील 'अनसीन अनदेखा'मध्‍ये.

Recommended

Loading...
Share