बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारा व्यक्ती इतर उमेदवारांमध्ये लगेचच रुळला जातो.असंच काहीसं झालं आरोह वेलणकर या नुकत्याच वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या स्पर्धकाचं. आरोह वेलणकर इतर स्पर्धकांसमोर त्याची प्रेम कहाणी आणि त्याची जीवनभराची सोबती अंकिता शिंगवी बद्दल सांगताना आपल्याला दिसणार आहे.
''आम्हा दोघांमध्ये अॅटिट्यूड होता, मी ज्या नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो त्यातच ती कोरिओग्राफर डान्सर होती आणि आमच्यात आइस ब्रेकर हा असा होता की मला असाइनमेंट्स सबमिट करायला वेळ नाही भेटायचा, इंजिनिअरिंग करत होतो आणि मी नाटकात असायचो म्हणून अंकिता आणि माझ्या अजून १-२ मैत्रिणी होत्या त्या माझ्या सबमिशन्स करुन द्यायच्या!'' असे आरोह म्हणाला.
यावर शिव लगेचच आपले कॉलेजचे दिवस आठवू लागला. पण आरोह आपली प्रेमकहाणी पुढे सांगू लागला, ''आधी फक्त तिला इरिटेट करण्यासाठी बघायचो, मग एक दिवस असं वाटलं की यार चांगली दिसतेय रे अंकिता आणि रॅन्डमली एक दिवस मी तिला विचारलं आणि ती पण हो म्हणाली. मग अफेयर सुरु झालं आणि काही महिन्यांनंतर आमचं ब्रेकअप झालं.''
यावर सर्व अचंबित झाले, पण तो पुढे बोलत राहिला, ''ब्रेकअप झाल्यानंतर मला त्रास व्हायला लागला. आधी काही सिरिअसनेस नव्हता पण ब्रेकअप नंतरचे जे ६ महिने गेले ना त्यात मला असं व्हायचं की ती दुस-या मुलाबरोबर समजा बसली ऑर गेली कुठे तर मला त्रास व्हायचा. त्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग फायनली मी तिला विचारलं मग काही टाईम डेट केलं मग सरळ लग्न.''
आपण असं म्हणू शकतो की, ही खरोखरंच 'रब ने बना दी जोडी' आहे! बिग बॉसच्या घरातील अशाच न ऐकलेल्या कहाण्या तुम्हाला Voot ऍपवर पाहायला मिळतील.