By  
on  

बिग बॉस मराठी 2: वीणा जगतापचं हे स्वप्न आहे अजूनही अधुरं

बिग बॉसच्‍या घरामध्‍ये आपल्‍या आवडत्‍या स्‍पर्धकांविषयी माहित नसलेल्‍या गोष्‍टी व तथ्‍यं जाणून घेता येत आहेत. अशाच एका क्षणी घरातील स्‍पर्धक आपल्‍या संस्‍मरणीय प्रसंगांविषयी आणि आपल्‍याला वाटणा-या भयाबाबत बोलते झाले. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये वीणा जगताप तिला एकटे राहण्‍याचे भय वाटते आणि तिला यातून बाहेर यायचे असल्‍याबाबत सांगताना दिसून आली.

 

''त्‍या दिवशी माधव, नेहा आणि मी बसलेलो तेव्‍हा पण मी त्‍यांना हेच सांगितलं की मला एकटं राहायची खूप भिती वाटते किंवा एकटं कुठे जायला.'' असे वीणा शिव ठाकरेला सांगते. ती पुढे सांगते, ''मला ती एक सोलो ट्रिप करायची आहे पण माझी नाही हिंमत होत. 'राधा प्रेम रंगी रंगली' शो संपल्‍यावर पण मी खूप विचार केला की सोलो ट्रिप करायची पण जमतंच नाही. भिती वाटते की यार सोलो ट्रिप कशी करायची, विथइन इंडिया तरी करुन बघायची आहे, मला तो फिअर घालवायचा आहे, पण नाही जमत.''

यावर शिव उत्‍सुकतेने विचारतो, ''सोलो ट्रिप कशाला? मज्‍जा येते तुला एकटीला?'' यावर वीणा सांगते की, तिला एकटेपणाच्‍या या भितीवर मात करायची आहे आणि त्‍यानंतर ती आपला शॉपिंगचा एक प्रसंग सांगू लागते, ''जेव्‍हा इथे शिफ्ट झाले तेव्‍हा तर शॉपिंगला सुद्धा एकटीला जायला जमायचं नाही मला, पैसे आहेत पण कोणीच कंपनी नाही मग कसं जाणार. मग एकदा मी ठरवलं की आज एकटंच जायचं, निघाले बिल्डिंग खाली आले, मग बांद्रा गेले तिथे माऊंट मेरीला गेले, बसले थोडा वेळ मग तिकडून हिल रोडला गेले तिथून काहीतरी शॉपिंग केली आणि मग मरीन ड्राइव्‍हला जाऊन बसले, सगळं एकटीच, २०१५ची गोष्‍ट आहे ही. तेव्‍हा ठरवलेलं की आता बस कोणी आहे नाही आहे हा विचार काढून टाकायचा, यू आर विथ यूअरसेल्‍फ, नंतर ती भिती निघून गेली.'' हे ऐकून नंतर शिवने देखील त्‍याला एकटेपणाची भिती वाटत असल्‍याचे सांगितले.

आपण आशा करुया की, वीणा तिच्‍या एकटेपणाच्‍या भितीवर मात करुन लवकरच सोलो ट्रिपवर जाईल. तोपर्यंत अधिक जाणण्‍यासाठी पाहत रहा अनसीन अनदेखा केवळ वूटवर!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive