By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरात आरोह झालाय ‘होमसिक’

प्रत्‍येक घरामध्‍ये राहणा-या कुटुंबासाठी काही नियम असतात. आजीआजोबांपासून मुलांपर्यंत घरातील प्रत्‍येकजण या नियमांचे पालन करतो. याचप्रमाणे बिग बॉस घरात स्‍पर्धकांनी पालन केले पाहिजेत असे काही नियम आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर कार्यवाही देखील करण्‍यात येते. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये आरोह आणि हिना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या कुटुंबांच्‍या शिस्‍तबद्ध नियमांबाबत चर्चा करताना दिसत आहेत.

हिना यासंदर्भात हसत बोलते, ''मला एकदा माझ्या वडिलांनी पहिल्‍यांदा लाफा मारला होता, कारण रात्री १२ वाजता मला टीव्‍ही बघायचा होता. मी जिद्द करत होती, एक लाफा मारला पप्‍पाने मला आणि झोपायला जायला सांगितलं.'' आरोह त्‍याच्‍या बालपणीच्‍या आठवणींबाबत सांगतो, ''माझ्याकडे टीव्‍हीचा विषयच आला नाही कारण की माझ्याकडे सेकंड इअरपर्यंत टीव्‍हीच नव्‍हता. स्ट्रीक्‍टपेक्षा पण जास्‍त डिसीप्‍लीन!"

लहान असताना त्‍याच्‍या घरामध्‍ये पालन करण्‍यात आलेली शिस्‍त व नियमांबाबत सांगताना तो म्‍हणतो, ''माझ्या घरातला डिसीप्‍लीन म्‍हणजे, ७ वाजता सगळे घरात येणार, देवासमोर प्रेयर. हे मी अगदी १०वी-१२वी पर्यंत केलं आहे आणि ७.३० ला जेवायचं सगळ्यांनी एकत्र बसून, मग ९.३० ऑर मॅक्झिमम १० ला लाइट बंद. माझ्या आत्‍याकडे वगैरे भांडण झालं ना तर मॅक्‍स चिडण्‍याची आणि ओरडण्‍याची लेव्‍हल म्‍हणजे 'काही तरीच असतं हा तुझं', ही कमेंट पास होणं म्‍हणजे काहीतरी डेंजर घरात झालं. आय अॅम टॉकिंग अबाऊट डिसीप्‍लीन अॅण्‍ड डिसेन्‍सी.'' 

शिवानी मध्‍येच आरोहला विचारते, ''तुला असं इकडे बघून त्‍यांना सांस्‍कृतिक धक्‍का वगैरे बसत असेल का?" याबाबत आरोह प्रत्‍युत्‍तर देतो, ''सांस्‍कृतिक धक्‍का नसतो, काय आहे ना शिवानी आपण घरच्‍यांबरोबर तसे नसतो ना जसे आपण बाहेर असतो. सो ते एन्‍जॉय पण करत असतीलही ह्याचे एवढे शेड्स आहेत आम्‍हाला माहितच नव्‍हते.''

याबाबत शंकाच नाही की शिस्‍त यशासाठी महत्‍त्‍वाची असते. पाहा तुमच्‍या आवडत्‍या स्‍पर्धकांबाबत अशी अज्ञात तथ्‍ये फक्‍त वूटवरील 'अनसीन अनदेखा'मध्‍ये.

Recommended

PeepingMoon Exclusive