बिग बॉस मराठी 2: वीणा-शिवच्या नात्यात आलीय दरार

By  
on  

बिग बॉस मराठी 2 हा रिऍलिटी शो आता अंतिम टप्यावर आहे. लवकरच या सिजनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. बिग बॉसच्या घरात कायम चर्चेत असलेले दोन व्यक्ती म्हणजे विणा आणि शिव. घरातले या दोन लव्हबर्ड्सच्या प्रेमाच्या चर्चा नेहमीच घरात आणि घराबाहेर नेहमीच चर्चेत असतात. परंतु नुकतंच त्यांच्या नात्यामध्ये फुट पडलीय का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

आजच्या भागात वीणा आणि शिव हे एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात. परंतु दोघांमध्ये काहीतरी बिनसतं आणि शिव तिथून उठून जातो. वीणा आणि शिवच्या घरात रंगलेल्या प्रेमलीलांवर महेश मांजरेकरांनी दोघांची वीकएंडच्या डावात चांगलीच खरडपट्टी काढली.

 

त्यामुळे या गोष्टीवरून  दोघांच्या नात्यामध्ये काही फूट पडलीय का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच बोलताना शिव ''मी सेफ झालो  म्हणून तुला प्रॉब्लेम आहे का?''असा प्रश्न वीणाला विचारतो. या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं याचा उलगडा आजच्या भागात प्रेक्षकांना होईल. 

Recommended

Loading...
Share