बिग बॉस मराठी 2: बिग बॉसच्या फिनालेनंतर वीणा-शिवच्या घरात सनई-चौघडे वाजणार?

By  
on  

 यंदाचा बिग बॉसचा सीझन अनेक कारणांनी गाजला. अभिजीत बिचुकलेंची अटक, शिवानीचं घराबाहेर जाणं आणि पुन्हा शोमध्ये येणं, पराग कान्हेरेचं घराबाहेर जाणं. पण सगळ्यात चर्चेत राहिलं ते वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांचं नातं. मांजरेकरांनी अनेकदा समजावून सांगूनही शिव आणि वीणाने त्यांच्या नात्याशी कोणतीही बेपर्वाई केली नाही.

 

घरात नुकत्याच पार पडलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रथितयश वृत्तवाहिनीने वीणा आणि शिवला त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले असता या जोडीने लग्नाच्या विचारात असल्याचं कबूल केलं. त्यामुळे बिग बॉसच्या घरात सुरु झालेला हा रोमॅंटिक प्रवास आता लग्नवेदीपर्यंत कधी पोहोचतोय याची चाहत्यांना उत्सुकता आहे. यावेळी शिवला सगळ्यात जास्त टेन्शन आहे ते घरच्यांच्या प्रतिक्रियेचं.

 

त्यामुळे वीणा-शिवच्या लग्नाला शिवच्या घरच्या बिग बॉसची परवानगी कधी मिळेल याची उत्सुकता आहे. यावेळी वीणा आणि शिव दोघांचेही चेहरे आनंदाने चमकत होते. त्यांचे फॅन्स दोघांना एकत्र पाहण्यास आतुर असतात

Recommended

Loading...
Share