बिग बॉस शो म्हणजे आधी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा शो असायचा. आपले लाडके सेलिब्रिटी कसे सामान्य जीवन जगतात आणि एकमेकांसोबत कसे जुळवून घेतात, हे जाणून घ्यायल मिळावं म्हणून तासभर टीव्ही समोर बसून त्यावरुन खुमासदार चर्चा घर-ऑफीसात रंगवल्या जायच्या . परंतु नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या बिग बॉस 13 व्या सीझन बाबतीत काहीसं वेगळंच घडतंय.
सुपरस्टार सलमान खानच्या 'बिग बॉस 13' सह प्रेक्षकांनी जोडून राहण्यासाठी मेकर्सनी अनेक शक्कल लढवल्या आणि बदलसुध्दा घडवून आणले. पण हा शो मात्र अपयशीच ठरतोय असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. याचा परिणाम म्हणजे BARC च्या हिंदी मनोरंजनाच्या टॉप 10 लिस्टमधून 'बिग बॉस 13' बाहेर पडला. इतकंच नव्हे तर ह्या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी सतत होत आहे.
मिडीया रिपोर्टनुसार, BARCच्या नवीन डेटा रॅकींगमध्ये 'बिग बॉस 13' तीन स्लॉट मागे पडला आहे. याऊलट अमिताब बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती आणि 'द कपिल शर्मा शो', 'बिग बॉस' च्या पुढे आहे. टॉप 10 लिस्टमध्येसुध्दा आपली जागा कायम ठेऊन आहेत म्हणूनच सलमानचा हा शो आता फ्लॉप शो म्हणून प्रेक्षक त्याकडे पाठ तर वळवत नाहीत ना असाच सवाल उपस्थित झाला आहे.