EXCLUSIVE : यंदाचे हिदी बिग बॉस सिझन पक्षपाती - शिल्पा शिंदे

By  
on  

बिग बॉस शो म्हटला की चर्चा तर होणारच. आणि सध्या अशीच सगळीकडे चर्चा सुरु आहे हिंदी ‘बिग बॉस सिझन 13’ची. शो सुरु झाल्यापासूनच काहीना काही घडामोडी या बिग बॉसच्या घरात घडताना दिसत आहेत. त्यातच मधुरिमा आणि विशालमध्ये झालेल्या वादानंतर आणखीनच चर्चा होऊ लागल्यात. मात्र या सगळ्या घडामोडींवर आता बिग बॉसच्या मागील सिझनमधील स्पर्धक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हिंदी बिग बॉस सिझन 11ची विजेती शिल्पा शिंदेने पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बऱ्याच गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे. 


यंदाच्या हिंदी बिग बॉस सिझन 13मध्ये पक्षपात सुरु असल्याचं पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया शिल्पा शिंदेने दिली आहे. याविषयी बोलताना शिल्पा शिंदे म्हटली की, “यंदाच्या हिंदी बिग बॉसच्या सिझनमध्ये पक्षपात सुरु आहे. एका बाजुनेच हा खेळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या यंदाचा गेम हा सिद्धार्थच्या बाजुने सुरु असल्याचं मला वाटतय. तर दुसरीकडे विशालच्या विरोधात सगळं कट कारस्थान सुरु असल्याचही पाहायला मिळतय.” असं म्हणत भाभीजी फेम शिल्पाने बिग बॉसलाच दोषी ठरवलयं.

यंदाच्या सिझनमधील स्पर्धक आणि एक्स कपल मधुरीमा तुली आणि विशाल यांच्या वादाची तुलना शिल्पाने तिच्या विकास गुप्तासोबतच्या वादासोबत केली.


याविषयी बोलताना शिल्पाने सांगीतलं की, “पाणी फेकणं हे काय प्रोवोक करणं नसतं. हे सगळं विशालच्या विरोधात होतं, बिग बॉसच सगळ्यांचा तोंडावर मोरल डाऊन करत आहे, पाणी तर विकास गुप्ताने पण टाकलं होतं. तेव्हा त्यांना व्हायोलन्स नाही दिसला” असं म्हणत शिल्पा शिंदेने यंदाचं बिग बॉसचं सिझन पक्षपाती असल्याचं सांगीतलं. 

Recommended

Loading...
Share