Exclusive: रितेश देशमुख म्हणतो,शिवाजी महाराजांवरील सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु

By  
on  

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत.शिवरायांचा सुवर्ण इतिहासाबद्दल प्रत्येकाच्या मनात नेहमीच उत्सुकता असते आणि अभिमानाने ऊर दाटून येतो. मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा 19 फेब्रुवारी जन्मदिवस सर्वत्र शिवजयंती म्हणून उत्साहात साजरा केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य मराठी व हिंदीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता रितेश देशमुखने उचललं आहे. दोन वर्षांपूर्वी रितेश देशमुखने या सिनेमाची घोषणा ट्विट करून केली होती. रवी जाधव या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत असून. परंतु अद्याप या सिनेमाच्या प्रोजेक्टबद्दल काहीच हालचाल दिसून आली नाही. या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने पिपींगमून मराठीसोबत खास बातचित केली.

रितेश सांगतो “आम्ही शिवाजी महारांजावरील सिनेमाच्या स्क्रिप्टवर अजून काम करतोय. स्क्रिप्ट वाचन पूर्ण झालं असून या फेब्रुवारी महिन्याअखेरीस ही स्क्रीप्ट लॉक होईल. महाराजांसारख्या महान पराक्रमी राजाच्या जीवनावरील सिनेमा असल्याने तो काळजीपूर्व हाताळण्याची भलीमोठी जबाबदारी आमच्या संपूर्ण टीमवर आहे ”.

https://www.instagram.com/p/BuD5NUzhqZd/?utm_source=ig_share_sheet&igshid=1rstczitx0ayc

 

सिनेमा कधी प्रेक्षकांसमोर येणार या प्रश्नावर रितेश म्हणतो, “महाराजांवरील सिनेमासाठी प्रेक्षकांसारखाच आमच्या टीममधला प्रत्येकजण उत्सुक आहे. पण हा सिनेमा मोठ्या पडद्यावर साकारताना त्यासाठी सखोल अभ्यास आणि बारकावे यावर आमची टीम काम करतेय.लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येईल.”

 

 

Recommended

Loading...
Share