‘स्लमडॉग मिलेनियअर’ फेम अभिनेता मधुर मित्तलवर लैंगिक शोषणाचा आरोप

By  
on  

स्लमडॉग मिललेनिअरमधील अभिनेता मधुर मित्तलवर लैंगिक शोषणाचा आरोप दाखल झाला आहे. पुर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंडच्या घरी घुसून मारहाण करण्याचा आरोप मधुरवर आहे. खार पोलिस स्टेशनमध्ये मधुरविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. 2020 मधील डिसेंबरमध्ये या तरुणीची आणि मधुरची ओळख झाली होती. 

पण 15 दिवसातच मधुरने तिच्यासोबत असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर त्या तरुणीने त्याच्याशी संबंध संपवल्यानंतर मधुर रागात तिच्या घरी गेला. तिला केस पकडून मारहाण केली. तरुणीला यात मान, बरगड्या हात, पाठ, डोळे याठिकाणी दुखापत झाली आहे. मधुरने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो सध्या वेबसिरीजच्या शुटिंगसाठी जयपूरमध्ये आहे.

Recommended

Loading...
Share