जय मल्हार मालिकेमुळे महराष्ट्राच्या घराघरांत खंडेराय म्हणून लोकप्रिय ठरलेला अभिनेता देवदत्त नागेला आपल्या आगामी सिनेमाच्या शुटींगदरम्यान पायाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. पण कामातून अजिबात ब्रेक न घेता त्याने आपलं काम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
देवदत्त नागेमुळे खंडेराय या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताची गाथा लहांनापासून–थोरांपर्यंत सर्वांनाच पाहायला मिळाली. अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या सिनेमात झळकल्यानंतर त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. याच प्रोजेक्टच्या शुटींगदरम्यान देवदत्तच्या पायाला ही दुखापत झाली.
दरम्यान, देवदत्त एका मराठी सिनेमाचं शुटींग करत असल्याचे बोलले जात होते. पण अजूनही त्याचा आगामी सिनेमा मराठी आहे की हिंदी हे कळू शकलेलं नाही.
https://www.instagram.com/p/Bq9OxykFt4_/