By  
on  

रोहित शेट्टीच्या 'सिंबा'मध्ये पाहायला मिळणार वैदेही-सिद्धार्थची जादू

रोहित शेट्टीचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना शंभर टक्के मनोरंजनाची हमी असते. अॅक्शन, विनोद, लव्हस्टोरी अशा प्रत्येक विषयाची मांडणी त्याच्या सिनेमात दिसून येते. आताही रोहित असाच एक धमाल चित्रपट घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहे. 'सिंबा'हा त्याचा आणखी एक धमाकेदार सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नेहमीप्रमाणे या चित्रपटात ही मराठमोळ्या कलाकारांची रेलचेल आहे. त्यातील दोन उल्लेखनीय नावं म्हणजे सिध्दार्थ जाधव आणि वैदेही परशुरामी.

सिद्धार्थ यात तडफदार पोलिसाच्या भूमिकेत आहे. 'सिंबा च्या सेटवरही सिध्दार्थने चांगलीच धमाल केली होती. याशिवाय रणवीरसोबत त्याची चांगली मैत्री झाली आहे. 'सिंबा'च्या ट्रेलरमध्ये सिध्दार्थ त्याच्या तोंडी असलेल्या संवादामुळे लक्षात राहतो. आता सिनेमात त्याचा अभिनय कसा झाला आहे हे लवकरच कळेल. तर या चित्रपटातील दुसरी उल्लेखनीय कलाकार म्हणजे वैदेही परशुरामी.

वैदेही अलीकडेच 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आली आहे. त्यातील तिच्या भूमिकेमुळे समीक्षकांची वाहवा देखील तिने मिळवली. 'सिंबा' चित्रपटात तिची भूमिका एक शिक्षकेची असल्याचं ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. यात तिचा लुक साधा असला तरी छोटी परंतु लक्षवेधी भूमिका तिच्या वाट्याला आली आहे. एकूण काय 'सिंबा'चा ट्रेलर दमदार आहे. विशेष म्हणजे रोहितने यात अजयचा अपिअरन्सही दाखवला आहे. त्यामुळे या चित्रपटात 'सिंबा' आणि सिंघमच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येईल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive