सेलिब्रिटींचं लग्न म्हणजे चाहत्यांमध्येही त्यांचे फोटो पाहून समाधान मानणं व त्यांच्या आनंदात सहभागी होणं. बॉलिवूड आणि उद्योगपतींमध्ये लग्नसराईची धूम सुरु असतानाच आपले मराठी सेलिब्रिटीसुध्दा कसे मागे पडतील. मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांनी 10 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली.
याआधी मराठी पिपिंगमून डॉट कॉमशी बोलताना स्नेहा म्हणाली होती, “ हो,माझा आणि अनिकेतचा 5 ऑगस्ट रोजी पुण्यात साखरपुडा पार पडला. या खास सोहळ्याला फक्त नातेवाईक आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थितीत होते.आमचं लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे.आमचं हे अरेंज मॅरेज आहे. एकाच इंडस्ट्रीत आणि सहकलाकार असल्याने हे लव्ह मॅरेज आहे, की काय असा गैरसमज होऊ शकतो. पण तसं काही नाही. आमच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी पुढाकार घेतला आहे.”