By  
on  

मराठी ता-यांनाही पडली #10yearchallenge भुरळ, पाहा कुणी कुणी शेअर केले फोटो

अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचणा-या सोशल नेटवर्किंग साइटवर एखादी नवीन गोष्ट आली,  की लागलीच त्याचा ट्रेंड बनतो! असाच एक ट्रेंड इंस्टाग्रामवर सध्या मोठ्या प्रमाणात चालत आहे. हॅशटॅग च्या इन्स्टा जगात #tenyearchallange ने नेटक-यांना अक्षरशः खूळ लावले आहे, यात आपल्या दहा वर्षापूर्वीचे आणि सध्याचे फोटो एका फ्रेममध्ये लावले जातात. विशेष म्हणजे बाॅलीवूडनेही या नव्या हॅशटॅगचे स्वागत केले असून, मराठी कलाकारांनी देखील #tenyearchallange स्वीकारले आहे.ज्यात अमेय वाघ, सुयश टिळक यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांचा तर अभिनेत्री अमृता खानविलकर, रूपाली भोसले यांसारख्या कैक मराठी तारकांचा समावेश आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive