By  
on  

मणिकर्णिकाच्या सेटवर अभिनेता वैभव तत्ववादीची या व्यक्तीशी झाली खास भेट, शेअर केला फोटो

अभिनेता वैभव तत्ववादी सध्या मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तो कंगना राणावत, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी, सुरेश ओबेरॉय यांच्यासमवेत अनेक ठिकाणी प्रमोशनसाठी हजेरी लावत असतो. मुंबईत अलीकडेच मणिकर्णिकाचं स्क्रीनिंग होतं. या स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

पण या प्रसंगी एका व्यक्तीची उपस्थिती विशेष लक्षवेधी होती. आध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव उर्फ सद्गुरु यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. वैभवलाही यावेळी सद्गुरुंची भेट घेण्याची संधी मिळाली. या संधीसाठी त्याने कंगनाचे आभारही मानले आहेत.

https://twitter.com/vaibbhavt/status/1087693580746002432

यासंबधी सोशल मिडियावर आठवण शेअर करताना तो म्हणतो. ‘सद्गुरुंची भेट होणं म्हणजे माझ्यासाठी एका स्वप्नाची पूर्ती असल्यासारखं आहे. त्यामुळे केवळ धन्यवाद हा शब्द कंगनासाठी पुरेसा नाही.’ या भेटीचे फोटोही त्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

https://twitter.com/vaibbhavt/status/1087211564095148032

Recommended

PeepingMoon Exclusive