By  
on  

रितेश देशमुखला करायचं आहे या कलाकारांसोबत काम, केला फोटो शेअर

प्रत्येक कलाकाराचं कलेशी संबंधित काहीना काही स्वप्न असतं. अभिनेता रितेश देशमुखचं देखील असंच एक स्वप्न आहे रितेशला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम करायचं होतं. टोटल धमाल सिनेमाच्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण देखील झालं आहे.
रितेश टोटल धमालमध्ये या दोघांसोबत दिसणार आहे. धमाल या फ्रेंचाईजीचा टोटल धमाल हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमात रितेश सोबत अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित दिसणार आहेत.

https://twitter.com/Riteishd/status/1091202873642418176

रितेशने अलीकडेच या दोघांसोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात रितेश म्हणतो, ‘हास्य सगळं काही सांगत आहे, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम करणं माझं स्वप्न होतं. या दोघांसोबत काम करण्याची संधी मिळणं हे एक स्वप्न आहे.’
रितेश, अनिल आणि माधुरी शिवाय या सिनेमात अजय देवगन, अर्शद वारसी आणि जावेद जाफरी यांसारखे कलाकार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive